Chinchwad Business News : दिलीप सोनिगरा ज्वेलर्समध्ये खास अक्षय्य तृतीयेनिमित्त आकर्षक दागिन्यांचा भरपूर स्टॉक

एमपीसी न्यूज – अक्षय्य तृतीयेला आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. अनेक जण अक्षय्य तृतीयेनिमित्त नवीन दागिन्यांची खरेदी करतात. महिलावर्ग त्यासाठी आधीपासूनच पैशांची तजवीज करून ठेवतात. त्यातच दागिन्यांची खरेदी प्रत्येक स्त्रीच्या मनातला हळवा कोपरा असतो. छोटासा का होईना सोन्याचा दागिना घेण्यासाठी वर्षभर बचत केली जाते.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया या सणाच्या मुहूर्तावर लोक खरेदी बरोबरच नवीन कार्य सुरू करतात. सध्या सोन्याच्या बरोबरीने हिऱ्यांच्या दागिन्यांची देखील विशेषत्वाने खरेदी केली जाते. तसेच गुढीपाडव्यानिमित्ताने भेट देण्यासाठी चांदीचे दागिने किंवा वस्तू देखील खरेदी केल्या जातात.

चिंचवडगावातील दिलीप सोनिगरा ज्वेलर्स येथे अक्षय्य तृतीयेनिमित्त ग्राहकांच्या पसंतीस उतरतील, अशा विविध प्रकारच्या सोने-चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची लयलूट आहे. वेगवेगळ्या आकर्षक, लेटेस्ट फॅशनचे दागिने येथे उपलब्ध आहेत.

केवळ चिंचवडगावातच नव्हे तर पिंपरी चिंचवड शरहरामध्ये प्रसिद्ध असलेल्या या दुकानात खरेदीसाठी अनेक आकर्षक पर्याय नेहमीच उपलब्ध आहेत.

येथे फक्त सोने चांदीच नव्हे तर हिरे, मोती, रत्ने, सेमी प्रेशस स्टोनमधील विविध प्रकारचे दागिने मिळतात. मंगळसूत्रांची विविध डिझाईन्स, गजलक्ष्मी, मार्बल मूर्ती, सोन्याचे हत्ती, गणपती, लक्ष्मी, सरस्वती यांना गुढीपाडव्याला अधिक पसंती मिळते. तसेच येथे ग्राहकांसाठी एक खास रिकरिंगची योजना  उपलब्ध आहे. ग्राहकाने अकरा महिन्यांचे पैसे भरल्यावर एक महिन्याचे पैसे सोनिगरा ज्वेलर्सकडून भरले जातात. ग्राहकांना १२ महिन्याच्या रकमेएवढ्या सोन्या-चांदीचा दागिना किंवा वस्तू तेराव्या महिन्यात मिळते.

त्यात देखील मजुरीवर दहा टक्के सूट मिळते. फक्त सोन्याच्याच नव्हे तर चांदीमध्ये डिनर सेट, दोन वाटी, पायल, जोडवी, नाशिक घाटाच्या समया, दिवे, भेट देण्यासाठी फॅन्सी वस्तू देखील येथे उपलब्ध आहेत. याशिवाय चिंचवडगावातील दुकानात ज्योतिष मार्गदर्शन केले जाते. ज्योतिषांनी सुचवलेली रत्ने शास्त्रशुद्ध पद्धतीने ग्रहकांना शुद्ध करुन दिली जातात.

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा.लि.

गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग चापेकर चौक,
चिंचवड
संपर्क ः 9371598104

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.