Chinchwad Business News : नवीन वर्षाची सुरुवात करा दिलीप सोनिगरा यांच्या नवीन धाटणीच्या दागिन्यांनी

एमपीसी न्यूज – नववर्ष म्हणजे उत्साह, चैतन्य, नवलाई असा (Chinchwad Business News) साऱ्या गोष्टींचा पिटारा असतो. जुन्या गोष्टी सोडून नव्याची कास धरण्याचा संकल्प आपण सारेच मनोमन करत असतो. असाच संकल्प घेऊन आले आहेत, चिंचवड येथील दिलीप सोनिगरा ज्वेलर्स. त्यांच्या नवीन धाटणीच्या, नवीन स्टाईलच्या दागिन्यांनी; तुम्हीही नवीन वर्षाची सुरुवात करा!

नवीन वर्षाची सुरुवात करताना मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीय किंवा अगदी स्वतःला एखादा अनोखा दागिना द्या, वर्षभर ते सोनं तुमची अगदी त्याच झळाळीने साथ देईल, तुमच्या आनंदाच्या क्षणाला तो दागिना सोनेरी किनार देईल.

PCNTDA: अखेर प्राधिकरण बाधितांचा प्रश्न निकाली; 15 दिवसात सव्वासहा टक्के जमीन आणि 2 एफएसआय मिळणार

अशाच आठवणी कायम ताज्या ठेवणारे अनोखे दागिने चिंचवडगावातील दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांनी आणले आहेत. जे की ग्राहकांच्या पसंतीस उतरतील, अशा विविध प्रकारच्या सोने-चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची लयलूट आहे. वेगवेगळ्या आकर्षक, लेटेस्ट फॅशनचे दागिने येथे उपलब्ध आहेत. केवळ चिंचवडगावातच नव्हे, तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रसिद्ध असलेल्या या दुकानात खरेदीसाठी अनेक आकर्षक पर्याय नेहमीच उपलब्ध आहेत.

येथे फक्त सोने चांदीच नव्हे तर हिरे, मोती, रत्ने, सेमी प्रेशस स्टोनमधील विविध प्रकारचे दागिने मिळतात. मंगळसूत्रांची विविध डिझाईन्स, गजलक्ष्मी, मार्बल मूर्ती, सोन्याचे हत्ती, गणपती, लक्ष्मी, सरस्वती देखील मिळतात. तसेच येथे ग्राहकांसाठी एक खास रिकरिंगची योजना उपलब्ध आहे. ग्राहकाने अकरा महिन्यांचे पैसे भरल्यावर एक महिन्याचे पैसे सोनिगरा ज्वेलर्सकडून भरले जातात. ग्राहकांना 12 महिन्याच्या रकमेएवढ्या सोन्या-चांदीचा दागिना किंवा वस्तू तेराव्या महिन्यात मिळते.

त्यात (Chinchwad Business News) देखील मजुरीवर दहा टक्के सूट मिळते. फक्त सोन्याच्याच नव्हे तर चांदीमध्ये डिनर सेट, दोन वाटी, पायल, जोडवी, नाशिक घाटाच्या समया, दिवे, भेट देण्यासाठी फॅन्सी वस्तू देखील येथे उपलब्ध आहेत. याशिवाय चिंचवडगावातील दुकानात ज्योतिष मार्गदर्शन केले जाते. ज्योतिषांनी सुचवलेली रत्ने शास्त्रशुद्ध पद्धतीने ग्रहकांना शुद्ध करुन दिली जातात.

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा.लि.
गोल्ड क्राफ्ट बिल्डिंग चापेकर चौक,
चिंचवड. संपर्क – 9325639950

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.