Rahatani News : दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित खास ‘लकी ड्रॉ’ शुक्रवारी उघडणार

सोने खरेदी करत 1200 ग्राहकांनी नेली कुपणे

एमपीसी न्यूज – ग्राहकांच्या सर्व आवडी-निवडी, सोयी सुविधांकडे बारकाईने लक्ष देणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणीतील दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त खास ‘लकी ड्रॉ’चे आयोजन करण्यात आले होते. त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 1200 ग्राहकांनी सोने खरेदी करत या ड्रॉमध्ये सहभाग घेतला. ही ‘लकी ड्रॉ’ची कुपणे उद्या (शुक्रवारी) उघडली जाणार आहेत. त्यामुळे पहिले ज्युपिटर मोटार सायकलचे बक्षीस कोणाला मिळणार याची उत्सुकता आहे.

यशदा कॉलनी सर्वे नंबर 47/3, नखातेनगर समोर, श्रीनगर रहाटणी फाटा येथील दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या शाखेचा सहावा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त खास ‘लकी ड्रॉ’चे आयोजन केले होते. 7 ते 19 मे 2022 दरम्यान सोने खरेदी करणा-या नागरिकांना एक लकी ड्रॉ कुपन आणि एक आकर्षक भेटवस्तु दिली. रहाटणीच्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या शाखेतून 9 हजार 999 आणि त्यापुढील सोन्याच्या दागिने खरेदी करणा-या ग्राहकाला एक ‘लकी ड्रॉ’ कुपन व एक भेटवस्तु दिली. 4 हजार 999 व त्यापुढील चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन आणि एक आकर्षक भेटवस्तु देण्यात आली.

तर, 1 लाख व त्यापुढील सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी केलेल्या ग्राहकाला एक आकर्षण पैठणी आणि लकी ड्रॉ कुपन देण्यात आले. या खास ‘लकी ड्रॉ’ला परिसरातील ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे 1200 ग्राहकांनी दागिने खरेदी करुन लकी ड्रॉ चे कुपन नेले आहेत. या खास लकी ड्रॉ ची कुपने उद्या (शुक्रवारी) सायंकाळी पाच वाजता रहाटणीतील शाखेत उघडली जाणार आहेत. दहा विजेत्यांना बक्षीसे दिले जाणार आहेत.

पहिले बक्षीस टीव्हीएस ज्युपिटर मोटरसायकल असणार आहे. दुसरे बक्षीस फ्रीज, तिसरे अँड्रॉइड मोबाईल फोन, चौथे बक्षीस कुलर तर पाचवे, सहावे, सातवे बक्षीस इंडक्शन शेगडी असणार आहे. आठवे, नववे मिस्कर आणि दहावे बक्षीस टोस्टर आहे. 1200 पैकी कोणत्या दहा विजेतांना ही बक्षीसे मिळणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.