Chinchwad Bye-Election :  मतदारांचा भाजपवर विश्वास, विजय माझाच होणार – अश्विनी जगताप

एमपीसी न्यूज – मतदारांचा भाजपवर विश्वास असून (Chinchwad Bye-Election) विजय माझाच होणार असल्याचा विश्वास भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानानंतर व्यक्त केला.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी चांगले मतदान झाले आहे. मतदारसंघातील मतदारांनी घराबाहेर पडून केलेल्या मतदानाबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघात केलेल्या विकासाला मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये पहिल्यापासून प्रचंड उत्साह होता. मतदान संपेपर्यंत हा उत्साह कायम राहिला. मतदारांनी मतदानातून दाखवलेला उत्साह भाजपला बळ देणारा आहे.

Chinchwad Bye-Election : ‘झाले इलेक्शन, आता सांभाळू रिलेशन’

ज्यादिवशी भाजपने मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, त्याचदिवशी माझा विजय निश्चित झाला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम करत आहेत. (Chinchwad Bye-Election) त्यामुळे सामान्य मतदारांचा भाजपवर विश्वास आहे की हाच पक्ष देशाला जगातील महासत्ता बनवू शकतो.

चिंचवड मतदारसंघातील मतदार सुद्धा भाजपवर विश्वास व्यक्त करणारा आहे. येत्या 2 मार्च रोजी मतमोजणीतून मतदारांचा भाजपवरील विश्वास आणखी दृढ झालेला असेल. निवडणुकीत माझा विजय होणार याची मला खात्री आहे, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.