Chinchwad Bye-Election : नाना काटे यांच्या प्रचारार्थ अजित पवार, आदित्य ठाकरे यांची रॅली

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते अजित पवार, (Chinchwad Bye-Election) माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिंचवडमध्ये रॅली काढली. थेरगावमधील गणेश मंदिरापासून बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली.

थेरगाव येथील गणेशनगरमधील गणेश मंदिरापासून वाकड पोलीस स्टेशन, सोळा नंबर सबवे, डांगे चौक, शिवाजी महाराज पुतळा, रोजवुड हॉटेल, श्रीकृष्ण कॉलनी, बारणे कॉर्नर, विजय सुपर मार्केट, अशोक सोसायटी, थेरगाव गावठाण, तापकीर चौक, सितारा चौक, गोडांबे चौक, शिवाजी महाराज पुतळा रहाटणी, तापकीर मळा, पंचनाथ चौक, बालाजी लॉन्स, संत निरंकारी मार्ग, बीआरटी रस्ता, काकडे पार्क, तानाजी नगर, एल्प्रो चौक, गांधी पेठ, चापेकर चौक, वेताळनगर, शिवाजीनगर, गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी, चिंतामणी मंदिर, गुरुद्वारा, डी. वाय. पाटील कॉलेज, भोंडवे कॉर्नर, शिंदे वस्ती, विकासनगर, आदर्शनगर मार्गे रॅली काढण्यात आली.

या रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, आमदार सुनील शेळके, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, प्रदेश प्रवक्ते रविकांत वर्पे, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे, संतोष बारणे, राजू बनसोडे सहभागी झाले होते.

Pune News : पुणे-नगर महामार्गावर कुटुंबावर काळाचा घाला, कंटनेरच्या धडकेत दोन वर्षाच्या मुलीसह चौघं जागीच ठार

”एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे राज्यात सत्तांतर घडले. शिवसेना संपवण्याची खेळी याच व्यक्तीला हाताशी धरून भाजपच्या नेत्यांनी केली आहे. (Chinchwad Bye-Election) माणुसकी आणि विश्वास यांच्या पाठीत खंजीर खुपसून चाळीस गद्दारांनी भाजपला हाताशी धरून शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र शिवसेना कधीच संपणार नसून ती अधिक ताकदीने उभी राहील”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

अजित पवार म्हणाले, ”उद्योगनगरी, आयटीनगरी कोणी उभी केली, विकासकामे कोणी केली हे येथील जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे, मात्र ‘खोटं बोल पण रेटून बोल’ या प्रवृत्तीच्या भाजप नेत्यांनी आम्ही केलेला विकास त्यांचा असल्याचा खोटा प्रचार चालविला आहे. त्यांच्या काळात चिंचवड मतदारसंघासाठी केलेली दोन महत्त्वाची कामे जाहीर करावीत”

वाकड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मयूर कलाटे यांच्या वतीने वाकड परिसरात रोड शो चे जंगी असे स्वागत करण्यात आले. यावेळी जमलेली गर्दी पाहता वाकड मधून विठ्ठल उर्फ नाना काटे यांना प्रचंड मताधिक्य मिळणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे हेच चिंचवड पोटनिवडणुकीत विजयी होतील असा विश्वास मयूर कलाटे यांनी यावेळी व्यक्त केला

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.