Chinchwad : पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील शिल्पांची साफसफाई

एमपीसी न्यूज – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती आणि दिलासा संस्था (Chinchwad )यांच्या वतीने नवी सांगवी पिंपळे ,गुरव परिसरातील संस्थांच्या वतीने शिल्पांची साफसफाई संस्थेच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने केली.

नवी सांगवी येथील ‘बेटी बचावो’ शिल्प , नर्मदा गार्डन जवळील ” भगवान शिवशंकर ‘ शिल्प, तसेच(Chinchwad) पिंपळे गुरव जवळील रामकृष्ण मंगल कार्यालय येथील ‘कृष्ण बासरी ‘ शिल्प या शिल्पांच्या भोवतीचा परिसर साफ करून, ही शिल्पे पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आली. त्याचबरोबर इतर ठिकाणचे पण शिल्प स्वच्छ करण्यात आले. यावेळी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले ” आपण प्रत्येक काम महापालिकेने केले पाहिजे असे म्हणतो ; पण एक जबाबदार नागरिक म्हणून पुढे येऊन कर्तव्य म्हणून काही काम केले तर मिळणारा आनंद मोठा असतो. सुट्टीच्या दिवसाचा खरा आनंद आज सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे.”

Pune : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसंबंधीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे अध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले ” सततच्या वाहतुकीमुळे आणि प्रदूषणामुळे चौका चौकातील ही शिल्पे मलीन झाली होती.आपण जसे आपले घर, अंगण उत्तम प्रकारे साफ करतो तसेच आपण राहतो त्या परिसरातील ही शिल्पे देखील साफ असायला हवीत. ही सुंदर शिल्पे आपल्या भागातील सौदर्य खुलवित असतात. येता जाता माणसे या देखण्या शिल्पांकडे पाहात असतात. त्या शिल्पांचे अभंग्यस्नान झाले पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. नविन वर्षाची सुरुवात खूप चांगल्या उपक्रमाने झाल्याचे समाधान मिळाले.

उपक्रमात स्वामी समर्थ शक्तीपीठ फुगेवाडीचे संस्थापक नंदकिशोर वाखारे, गुणवंत कामगार आण्णा गुरव, बाळासाहेब साळुंके, संजना करंजावणे, गणेश वाढेकर, मुरलीधर दळवी,ज्येष्ठ नागरिक प्रताप देवडकर,संगिता जोगदंड यांच्या सह रस्त्यावरुन येणारे जाणारे नागरिकही सहभागी झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.