Chakan : तिसऱ्या मजल्यावरून पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका ( Chakan )  सदनिकेच्या बेडरूमच्या खिडकीतून पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी आंबेठाण गावात घडली.
दुर्वेश ज्ञानेश्वर कारवार (वय 4, रा. साईबाबा पॅराडाईज, आंबेठाण, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

Mulshi : भूगाव मधील मानस तलावात कारमध्ये आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्वेशचे आई वडील सोमवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले. त्यानंतर त्याच्या घरी दुर्वेश, त्याची बहिण, काकू आणि आजी असे चौघेजण होते. दरम्यान दुर्वेश घरातील बेडरूम मध्ये खेळत होता. तो खेळता खेळता बेडरूमच्या खिडकीमध्ये गेला.
खिडकीतून त्याने खाली डोकावून पाहिले आणि त्याचा तोल गेला. तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित ( Chakan )  केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.