Mulshi : भूगाव मधील मानस तलावात कारमध्ये आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज – मुळशी तालुक्यातील भुगाव येथे मानस तलावामध्ये (Mulshi)एक कार आढळली. या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

रामदास हरिचंद्र पवार (वय 40, रा. आंबेगाव बु., पुणे) असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळशी(Mulshi) तालुक्यातील भुगाव येथे मानस तलावामध्ये एका चारचाकी गाडीचा मागचा भाग तरंगताना दिसत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास मिळाली. त्यानुसार मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे आणि पौड पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सिध्दार्थ पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.

Chinchwad : लावणी महोत्सव, काव्य पहाट, लोकनृत्य, एकांकिकेने नाट्य संमेलनाचा दुसरा दिवस गाजवला

आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाने गाडी (एमएच 14/सीवाय 0010) बाहेर काढली. गाडीतील मागच्या सीटवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.