Chinchwad Crime : दिघी, चिंचवड, निगडी, हिंजवडी मधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – दिघी, चिंचवड, निगडी आणि हिंजवडी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्या. याबाबत शनिवारी (दि. 31) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रफुल मनोहर सोनवणे (वय 30, रा. देहूफाटा आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनवणे यांची 10 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एम एच 14 / डी एस 8176) डुडुळगाव फाट्यावरून चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

नितीन राजेश सोनवणे (वय 28, रा. चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नितीन सोनवणे यांची 40 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी (एम एच 14 / एच जे 0603) अज्ञात चोरट्यांनी चिंचवडेचाळ, चिंचवडगाव येथून चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

अमर वसंत गोखले (वय 31, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोखले यांची 75 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एम एच 14 / एफ बी 1228) शनिवारी (दि. 31) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास संत तुकाराम गार्डन, प्राधिकरण येथून चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

नामदेव सोपान सुतार (वय 50, रा. सुतारवाडी, ता. हवेली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुतार यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 12 / एल एल 8582) शुक्रवारी (दि. 30) रात्री ननावरे वस्ती येथून चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.