Chinchwad crime News : शहरातून सात दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून सात दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 27) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोन मोबाईल फोन चोरीचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

तुकाराम चिंतामण बलखंडे (वय 30, रा. खराबवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बलखंडे यांची 20 हजारांची दुचाकी (एमएच 14 / डीयु 7577) अज्ञात चोरट्यांनी 19 सप्टेंबर रोजी रात्री अकरा ते 20 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजताच्या कालावधीत त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली.

मुनिरअहमद इलाहीबक्ष शेख (वय 47, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात त्यांच्या दुचाकी चोरीची तक्रार दिली आहे.

सचिन बाळू काळभोर (वय 27, रा. दळवीनगर, निगडी), शैलेश शामसुंदर पापत (वय 41, रा. झेंडे चौक, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे नोंदवले आहेत. काळभोर यांची 20 हजारांची मोपेड दुचाकी (एमएच 14 / जीजे 4345) तर पापत यांची दीड लाखांची बुलेट (एमएच 14 / एचजे 6007) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

राजू लक्ष्मण शेंडगे (वय 32, रा. गणेशनगर, पिरंगुट) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 27 सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चांदणी चौकातील बंद पेट्रोल पंप येथून चोरून नेली आहे.

विकास सुखदेव व्हरगर (वय 29, रा. देहूरोड) यांनी त्यांची 12 हजार रुपयांची दुचाकी (एमएच 45 / क्यू 2094) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेल्याची फिर्याद देहूरोड पोलीस ठाण्यात दिली आहे.

गोविंद लक्ष्मण कळसे (वय 22, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 15 हजारांची दुचाकी (एमएच 10 / एसी 9718)अज्ञात चोरट्यांनी वाकड येथील सार्वजनिक रोडवरून चोरून नेली आहे.

सौरभ मनीष सावळे (वय 20, रा. देहूफाटा, मोशी) त्यांच्या रिक्षात झोपेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाच हजारांचा मोबईल फोन चोरून नेला. ही घटना भोसरी येथील आळंदी रोड चौकात घडली आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विपुल रमेश पवार (वय 27, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांचा मोबईल फोन अज्ञात चोरट्यांनी चक्रपाणी वसाहत येथील पोटे हॉस्पिटल समोरून चोरून नेला असल्याची फिर्याद भोसरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.