Chinchwad : जबरदस्तीने फ्लॅटवर अतिक्रमण करणाऱ्या बारा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या जबरदस्तीने फ्लॅटवर अतिक्रमण केल्याप्रकरणी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) सकाळी गांधीपेठ चिंचवडगाव येथे घडली.

पंकज भालचंद्र देव, प्रवीण भालचंद्र देव, सई पंकज देव, नंदू भाईचंद तलाठी, दत्ता तिखे, किरण तिखे आणि अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र आबाजी भोसले (वय 45, रा. रावेत) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र भोसले यांचा गांधीपेठ चिंचवडगाव येथे दुर्वा हेरिटेज या सोसायटीमध्ये एक फ्लॅट आहे. आरोपींनी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास राजेंद्र भोसले यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. आरोपींनी फ्लॅटमधील सर्व सामान घराबाहेर फेकले. तसेच राजेंद्र यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बेकायदेशीररित्या त्यांच्या फ्लॅटवर अतिक्रमण केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.