Chinchwad : चाकण, चिंचवड, तळेगाव, हिंजवडी हद्दीत पाच वाहन चोरीचे गुन्हे दाखल

पाच घटनांमध्ये एकूण एक लाख 24 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत. : Five vehicle theft cases have been registered in Chakan, Chinchwad, Talegaon and Hinjewadi

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्यात दोन, चिंचवड, तळेगाव दाभाडे आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे वाहन चोरीचे एकूण पाच  गुन्हे मंगळवारी (दि. 18) दाखल करण्यात आले आहेत. अज्ञात चोरट्यांनी पाच घटनांमध्ये एकूण एक लाख 24 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत.

पहिल्या घटनेत प्रणव नंदकुमार घाटकर (वय 28, रा. टेल्को कॉलनी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घाटकर यांनी त्यांची 9 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / सीक्यू 8321) रविवारी (दि. 16) सकाळी साडेनऊ वाजता चाकण येथे बुलढाणा अर्बन बँकेसमोर पार्क केली.

भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुपारी साडेपाच वाजता उघडकीस आला.

दुस-या घटनेत भूपेंद्र सतीश पटेल (वय 27, रा. खराबवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पटेल यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 39 / आर 4291) शनिवारी (दि. 15) सायंकाळी सहा वाजता त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 16) सकाळी उघडकीस आली.

वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

तिस-या घटनेत रुद्राप्पा गुरुशांतआप्पा बिरदार (वय 35, रा. चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुद्राप्पा यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 / जीवाय 1380) 24 मार्च रोजी रात्री घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली.

तीन दिवसानंतर (दि. 27 मार्च) त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत तब्बल पाच महिन्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

चौथ्या घटनेत सागर किसन राक्षे (वय 27, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राक्षे यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / जीएफ 1581) रविवारी (दि. 16) रात्री घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 18) सकाळी उघडकीस आला.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

पाचव्या घटनेत आबिद निजामुद्दीन अन्सारी (वय 31, रा. सुसगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्सारी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 / जीयु 2967) 23 मार्च रोजी महाळुंगे येथे पार्क केली आणि गावी गेले. त्यानंतर ते 14 ऑगस्ट रोजी गावाहून पार्ट आले असता त्यांना त्यांची दुचाकी मिळाली नाही.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहेत.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.