BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : खवय्यांना नॉस्टॅल्जिक करणारे फ्युजन कॅफे

(अश्विनी जाधव)

एमपीसी न्यूज- तुमच्यापैकी किती जण येडाफोन आपलं वोडाफोन वापरतात? सध्या किती त्रास देतोय नाही.. मी तर दिवसातून कमीत कमी पंधरा वेळा तरी माझा फोन एरोप्लेन मोड वर टाकून काढते😂😂. तेव्हा कुठे थोडा वेळ रेंज मिळते. शेवटी विचार केला नवीन सिमकार्ड घेऊन टाकूया. म्हणून चिंचवडच्या ब्रांचला गेले होते. भर दुपारी एक तास एसीची हवा खाल्ल्यानंतर पोटातले कावळे ओरडून-ओरडून गार झाले होते. काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली होती. यू-टर्न मारून परत निघाले तर डाव्या बाजूला फ्युजन कॅफे दिसलं आणि बाहेरच बोर्ड लागलेला एक ऑक्टोबरपासून मिसळ चालू.. मग काय लगेच ब्रेक मारला आणि आत शिरले. आज गेल्या गेला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली अतिशय डिसेंट आणि कमालीची शांत जागा होती. आजकाल कौलारू घरं कुठे बघायला मिळत नाहीत इथेे कॅफे कौलारू होतं. इंटिरियर पण एक नंबर आणि त्यालाच साजेसं असं शांत म्युझिक. कॅफे तसा छोटाच पण सुटसुटीत.. कॅफेचा लुक आणि तिथलं environment इतकं अप्रतिम होतं की #नॉस्टॅल्जिक झाले मी. एकदम जुन्या काळातले कॅफे असायचे ना तसं होतं🥰

अर्थात आधी #हॉट_कॉफी नी श्रीगणेशा केला आणि मग मिसळीवर ताव मारला. तसं खूप दिवसानंतर मिसळ खात होते. मला हवी तशीच #झणझणीत आणि छान तिखट मिसळ होती. कांदा, टोमॅटो, मटकी, कोथिंबीर सगळे इन्ग्रेडियंट कसे परफेक्ट एकत्र आले होते. सोबतचा #कट तर बाबो इतका भारी तिखट होता की हा हू करत दोन दोन वेळा घेतला. लय आवडली मिसळ😋

बर तोपर्यंत तिथल्या कॅफे owner शी ओळख झालेली. त्यांनी त्यांचा #मुंबई_सँडविच try करायला सांगितलं. त्यांनी सांगितलं म्हणून हां 😉म्हणलं बघूया तरी काय प्रकार आहे. राहायचं पुण्यात आणि खायचं मुंबई सँडविच.. 😜 पण एकंदर छान होतं. स्पेशली त्यातला बटाट्याचं सारण मस्त हिरवी चटणी सोबतचं batter आणि बाकीचे व्हेजिटेबल्स अगदी मस्त एकजीव झाले होते.

बरं मधल्या वेळेत #पेरी_पेरी आणि #चीझ_फ्राइस घेऊन हाणून झाले होते. पावडर फॉर्म मध्ये असलेल्या मसाल्यामुळे अप्रतिम चव आली होती.

बर इतकं खाऊन पोटातली भूक आता बऱ्यापैकी शांत झालेली. खरं तर निघायला हवं होतं पण माझं लक्ष ना बराच वेळ पासून त्यांच्या मेन्यू कार्ड मधील #बनमस्का कडे होतं. माझा अतिशय मनापासून जवळचा असलेला पावाचा प्रकार. हो नाही हो नाही करत शेवटी बनमस्का आणि चहा ऑर्डर केलंच. बनची क्वालिटी फार छान होती. आता तर अजूनच नॉस्टॅल्जिक व्हायला झालं होतं.. कॉलेजचे दिवस आठवले.. एकदम गुडलक कॅफेमध्ये जाऊन पोचले होते मी🤩🤩

आणि अशाप्रकारे भर दुपारी झालेली माझी ही खाद्ययात्रा सुपर संपूर्ण🤗🤗😉

Fusion Cafe
Pimpri-Chinchwad Link Rd, Tanaji Nagar, Chinchwad, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411033
090221 01238

https://maps.google.com/?cid=11322474156178133233&hl=en&gl=us

Advertisement