Chinchwad : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने इसमाजवळ येऊन त्याला कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल फोन जबरदस्तीचे चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी सहाच्या सुमारास मदर तेरेसा ब्रिजजवळ घडली.

अभिजित निर्मलकुमार शहा (वय 39, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास मदर तेरेसा ब्रिजवरून पायी चालत जात होते. ब्रिजवरून जात असताना तीन अनोळखी इसम मोटारसायकलवरून त्यांच्याजवळ आले. त्यांनी अभिजित यांना पत्ता विचारला. त्यानंतर त्यांना लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीचे चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल केला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.