Hinjawadi : ठार मारण्याची धमकी देत पावणेतीन लाखांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – बळजबरीने घरात घुसून महिलेचे तोंड दाबून तिला ठार मारण्याची धमकी दिली. महिलेच्या अंगावरील 2 लाख 77 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून नेले. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी साडेतीनच्या सुमारास बावधन बुद्रुक येथे घडली.

चंद्रभागा उत्तम दगडे (वय 48, बावधन बुद्रुक) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी चंद्रभागा घरात एकट्याच होत्या. त्यावेळी एक अज्ञात चोरटा त्यांच्या घरात घुसला. त्याने चंद्रभागा यांचे तोंड दाबून आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. चंद्रभागा यांच्या गळ्यातील, कानातील, हातातील व पायातील सोन्या-चांदीचे 2 लाख 77 हजार रुपये किमतीचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.