Chinchwad News : राज्यात लवकरच 5200 पोलीस शिपाई पदांची भरती करणार : गृहमंत्री

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात गृहमंत्र्यांची आढावा बैठक

एमपीसी न्यूज – राज्यात लवकरच पाच हजार 200 पोलीस शिपाई पदांची भरती काढण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी सात हजार पदे भरण्यात येणार आहेत. राज्यात आणखी कारागृह उभारण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत शासन निर्णय घेणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी शनिवारी (दि. 17) दुपारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेट देत आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडेय, आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते.

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, कोरोना परिस्थितीनुसार कैद्यांसाठी कारागृहात उपाययोजना केल्या आहेत. त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार काही जणांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही नवीन जेलची निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतची मागणी आज झाली. त्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात येईल.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील समिती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.