Chinchwad News : मास्क न वापणाऱ्या 534 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – मास्क न वापरणा-यांवर कारवाईची मोहीम सध्या शहरात सुरु आहे. विनामास्क फिरताना आढळल्यास थेट दंडाची पावती केली जात आहे. रविवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 534 जणांवर विनामास्कची कारवाई केली.

रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात 845 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 1 लाख 14 हजार 26 एवढी झाली आहे. तर आजपर्यंत शहरात 2 हजार 666 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोना वाढत असल्याने खबरदारी घेण्यासाठी मास्क वापरण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. मात्र अनेकजण या नियमांना पायदळी तुडवून विनामास्क फिरताना आढळतात. अशा नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत.

रविवारी पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे 

एमआयडीसी भोसरी (60), भोसरी (22), पिंपरी (00), चिंचवड (68), निगडी (58), आळंदी (45), चाकण (40), दिघी (22), म्हाळुंगे चौकी (36), सांगवी (51), वाकड (63), हिंजवडी (20), देहूरोड (16), तळेगाव दाभाडे (01), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (07), रावेत चौकी (11), शिरगाव चौकी (14)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.