Chinchwad News: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून मंगळवारी 130 जणांवर कारवाई

Chinchwad News: Pimpri-Chinchwad police take action against 130 people on Tuesday कोरोनामुळे मंगळवारी 30 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पहिल्यांदाच एकाच दिवशी 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि.18) 130 जणांवर कारवाई केली आहे. शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यात टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून नागरिक आपल्या आरोग्याची हेळसांड करीत असल्याचे चित्र आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनामुळे मंगळवारी 30 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पहिल्यांदाच एकाच दिवशी 30 जणांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या विविध भागातील 785 आणि पालिका हद्दीबाहेरील 22 अशा 807 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 36 हजार 863 झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दररोज 800 ते 1000 रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. टाळेबंदीचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, काही नागरिक या नियमांना पायदळी तुडवत आहेत.

मंगळवारी (दि.18) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (32), भोसरी (5), पिंपरी (9), चिंचवड (8), निगडी (6), आळंदी (0), चाकण (2), दिघी (6), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (1), वाकड (12), हिंजवडी (10), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (11), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (24), रावेत चौकी (1), शिरगाव चौकी (3)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.