Chinchwad News : इन्व्हर्टरच्या बॅट-यांचे पैसे न देता दुकानदाराची नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बॅटरीच्या दुकानातून बॅटरी विकत नेल्या. त्याचे पैसे न देता दुकानदाराची तब्बल आठ लाख 88 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत नागाई बॅटरी पॉईंट, चिंचवड येथे घडला.

सचिन शर्मा (वय 30, रा. हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चिंचवडमधील शांतीवन सोसायटीमध्ये नागाई बॅटरी पॉईंट नावाचे दुकान आहे. आरोपी सचिन याने फिर्यादी यांच्या दुकानातून जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत आठ लाख 88 हजार रुपयांच्या इन्व्हर्टर बॅट-या व साहित्य नेले. त्याचे पैसे न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. तसेच त्याने फिर्यादी यांच्या दुकानातून नेलेल्या बॅटरी आणि साहित्य परस्पर विकून त्याचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.