Pimpri Chinchwad Half Marathon 2021: तयारी पूर्ण ! रविवारी शहरात हाफ मॅरेथॉन

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि.05) हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आले आहे. 5, 10 आणि 21 किलोमीटर अशी तीन प्रकारात ही स्पर्धा रंगणार आहे. पिंपळे सौदागर येथील पालिकेच्या मैदानावारून या स्पर्धेला सकाळी 7.00 वा सुरूवात होईल. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयर्न मॅन कृष्णप्रकाश या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

रस्ते सुरक्षा हा या हाफ मॅरेथॉनचा मुख्य उद्देश आहे. सहभागी स्पर्धेकांना टी- शर्ट, प्रमाणपत्र, फिनिशर मेडल, गुडी बॅग, झुंबा सेशन, आरोग्यदायी नाश्ता, धावतानाचे मोफत फोटो आदी गोष्टी पुरवल्या जाणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कमेचे बक्षीस आणि मेडल दिले जाईल. शनिवारी (दि.04) सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत व्हिजन फ्लोरा, कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर येथे एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे.

स्पर्धेच्या संपूर्ण तयारी झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ होईल. मोठ्या संख्येने नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

पालिका मैदान – शिवार चौक – कोकणे चौक – नाशिक फाटा – परत पालिका मैदान असा या मॅरेथॉनचा मार्ग असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.