Chinchwad News : पूर्णानगरला उद्यापासून सेवासप्ताह; विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

एमपीसीन्यूज : पूर्णानगर विकास कृती समितीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते विकास गर्ग यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत 9  ते 17  जून या कालावधीत सेवा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गरजू नागरिकांना मदत करण्यासह विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

उद्या ( बुधवारी ) पूर्णानगर येथे वृक्षारोपण आणि धान्य वाटप करून या सेवा सप्ताहाचा प्रारंभ होणार आहे. तर शुक्रवारी ( दि. 11 ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सरटेटरचे वाटप करण्यात येणार आहे.

त्यानंतर पूर्णानगर येथील दिशादर्शक फलकाचे अनावरण, नऊ नागरिकांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि मोफत लेन्स वाटप, पोलीस व नागरिकांना कोविड सेफ्टी किट, तसेच गोरगरिबांना जीवनावश्यक साहित्य वाटप, अनाथाश्रमातील मुलांना अर्थसहाय्य, वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीर तसेच कोविड योद्ध्यांचा गुणगौरव आदी सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांचे संयोजन पूर्णानगर विकास कृती समितीचे संभाजी बालघरे, शैलेश मोरे, विनोद रोकडे आणि सुनील कदम यांनी केले आहे.

सध्याचा कोविडच्या संकटात गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. या पुढेही असेच उपक्रम राबवून नागरिकांना मदत केली जाणार असल्याचे विकास गर्ग यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.