Chinchwad : चिंचवड स्टेशन जवळ एकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – रेल्वेखाली  एका व्यक्तीचा (Chinchwad) मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 26) दुपारी चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ घडली.

Mahalunge : पत्नी आणि पत्नीच्या मित्राने पळवली साडेतीन लाखांची रोकड, पतीची पोलिसात धाव

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ एका व्यक्तीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. अद्याप त्या व्यक्तीची ओळख पटली नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

ही घटना आनंदनगर झोपडपट्टीलगत घडली. बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. हा घातपाताचा प्रकार असल्याची प्रत्यक्षदर्शीमध्ये (Chinchwad) चर्चा होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.