Chinchwad crime : हातात तलवारी घेऊन दहशत पसरविणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज हातात तलवारी घेऊन परिसरात आरडा-ओरड करत दहशत पसरविणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.(Chinchwad crime) हा प्रकार बुधवारी (दि.12) रात्री साडे नऊ वाजता चिंचवड येथील लिंकरोड परिसरात घडला.

इरफान शाहनवाज शेख (वय 31 रा.लिंकरोड, चिंचवड) व आकाश राजु काळे (वय 30 रा. लिंकरोड, चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Tobacco control workshop : तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची – रामनाथ पोकळे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे हातात तलवारी घेऊन परिसरात आरडा-ओरड करत फिरत होते. आम्ही इथले भाई आहोत.(Chinchwad crime) आम्हाला कोणी नडला त्याला कापून काढू असे बोलून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली होती. याची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांनाही अटक केली आहे. याचा पुढिल तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.