Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘पोलीस स्थापना दिवस’ साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्र राज्याचा पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात आला. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलिसांवर आधारित दोन पथनाट्ये पोलीस आयुक्त कार्यालयात सादर केली.

पिंपरी येथील एचए स्कूलमधील विद्यार्थ्यांनी महिला-मुलींच्या सुरक्षेबाबत तर थेरगाव येथील प्रज्ञा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पथनाट्ये सादर केली. त्याचबरोबर पोलिसांची मदत मिळविण्यासाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांकाविषयी देखील पथनाट्यातून सांगण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त विनायक ढाकणे आदी उपस्थित होते.

दोन जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली. त्यानंतर काही वर्षे हा स्थापना दिवस साजरा करण्याचा विसर पोलीस दलाला पडला होता. मागील काही वर्षांपासून पुन्हा हा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. पोलिसांचे कर्तव्य, समाजात असणारे पोलिसांचे महत्व याबाबतची माहिती तसेच नागरिकांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.