Chinchwad : म्हाळुंगे लाच प्रकरणात वरिष्ठ निरीक्षकासह पोलीस कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज – तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दोघांना निलंबित केले आहे. मंगळवारी (दि. 1) त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव आणि पोलीस नाईक अजय भापकर असे निलंबन करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्याचे नाव आहे.

गुन्ह्यामध्ये ‘क’ फायनल पाठवण्यासाठी जाधव आणि भापकर यांनी तक्रारदाराकडे सात लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती शेवटी तीन लाख सुरुवातीला घेण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा मारून जाधव आणि भापकर यांना अटक केली.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत दोघांचेही निलंबन केले आहे. या कारवाईमुळे रिक्त झालेल्या झालेल्या म्हाळुंगे चौकीचा पदभार सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, गुन्हे शाखा युनिट तीनचा अतिरिक्त पदभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.