Chinchwad: पूर्णानगरच्या प्रशांत प्लाझा सोसायटीने गोरगरीबांसाठी पुढे केला ‘मदतीचा हात’

एमपीसी न्यूज – चिंचवडच्या पूर्णानगर येथील प्रशांत प्लाझा (दोन) सोसायटीतील रहिवाशांनी देखील देशातीवरील कोरोना आपत्तीमध्ये लॉकडाऊनचे परिणाम भोगावे लागत असलेल्या समाजातील गरजू कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.  

 कोरोना जागतिक महामारीच्या संकंटाला तोंड देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे शहरातील गोरगरीब जनतेकडे जेवणासाठी साधनसामग्री नाही. अशा लोकांना मदत करावी, असे आवाहन प्रभागातील नगरसेवकांनी केले होते. त्याला  प्रतिसाद म्हणून प्रशांत प्लाझा सोसायटीतील रहिवाशांनी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाव्दारे तात्काळ मदत केली.

दान केल्याने धन कमी होत नाही तर नवीन धन येण्यासाठी सात्विक समाधानाची मनामध्ये जागा निर्माण होते, हे इमारतीचे बिल्डर प्रशांत कहाणे यांनी बिंबवलेले विचार आहेत. त्यानुसार सभासदां|नी पंतप्रधान सहायता निधी आणि स्थानिक पातळीवरही चांगली मदत केली.

जमा केलेले धान्य सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन नगरसेवक व माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आले. त्यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुभाष सावंत, सचिव गणेश पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

एकनाथ पवार म्हणाले की, देश संकटात असताना केलेली मदत म्हणजे गोरगरीबांना एक प्रकारची संजीवनीच आहे. अध्यक्ष सुभाष सावंत, सचिव गणेश पाटील यांच्यामुळे या सोसायटीची वाटचाल ‘आदर्श सोसायटी’ निर्माण करण्याकडे होत आहे.

अतिशय क्रियाशील सोसायटी म्हणून नावाजलेली ही सोसायटी सामाजिक बांधिलकीसाठी कायम पुढे असते. महाराष्ट्रावर किंवा देशावर आलेल्या कोणत्याही नैसर्गिक आपतीमध्ये कायम मदतीचा हात असतो.

कोल्हपूर- सांगलीमध्ये पुराने अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. त्यांच्यासाठी देखील ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाद्वारे हजारो किलो धान्य, कपडे आणि वैद्यकीय संच पाठवले होते.  प्रशांत प्लाझा (दोन) सोसायटी कायमच चांगले योगदान देते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.