Chinchwad : प्रतिभा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – कमला शैक्षणिक संकुलाच्या प्रतिभा महाविद्यालयाचे (Chinchwad) वार्षिक स्नेहसंमेलन रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कलागुणांचं सादरीकरण केले.

याप्रसंगी झालेल्या लायन डॉ. परमानंद शर्मा यांच्या हस्ते वार्षिक नियतकालिक 2022-23 चे प्रकाशन करण्यात आले. समारंभात मंचावर संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, लायन डॉ. परमानंद शर्मा, शमा शर्मा, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. भूपाली शहा, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, स्नेहसंमेलन समन्वयक डॉ. श्रुती गणपुले, डॉ. जयश्री मुळे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक्षा कलापुरे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात लायन डॉ. परमानंद शर्मा ह्यांनी देशाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांच्या सहभागा बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. दीपक शहा ह्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थी केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून भविष्यात संस्थेचे नाव उज्वल करावे अशे आवाहन डॉ. भूपाली शहा ह्यांनी केले. डॉ. क्षितिजा गांधी ह्यांनी स्वागतपर भाषण केले. प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे ह्यांनी वार्षिक अहवाल वाचन तर, डॉ. श्रुती गणपुले ह्यांनी सांस्कृतिक अहवाल वाचन केले. डॉ. आनंद लुंकड ह्यांनी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य (Chinchwad) मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे सूची वाचन केले.

Talegaon Dabhade : प्रयत्नांच्या पराकाष्ठेतून स्वतःला सिद्ध करा – रामदास काकडे

मान्यवरांच्या हस्ते प्राविण्य प्राप्त शिक्षक, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रात विशेष चमक विद्यार्थीना गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे ‘फ्लेरं फेस्टो 2022’ अंतर्गत रंग-तरंग, बॉलीवूड जोडी, आर्टस् मेला, आंतर महाविद्यालयीन पारंपरिक नृत्य आणी बँड स्पर्धा संपन्न झाली.

विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून कलागुणांचं सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुलिका चॅटर्जी आणि आभारप्रदर्शन प्रा. सुवर्णा गोगटे यांनी केले. समारंभासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक उसैद मोमीन, यासिका जैन, ऋषभ लुनावत, विनायक भालेकर, भार्गवी बलकवडे यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.