Talegaon Dabhade : प्रयत्नांच्या पराकाष्ठेतून स्वतःला सिद्ध करा – रामदास काकडे

एमपीसी न्यूज : प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर विद्यार्थी दशेतील परिस्थितीवर मात करीत विद्यार्थ्यांनी स्वतःला घडवत प्रगती (Talegaon Dabhade) करणे अपेक्षित आहे. यशाच्या शिखरावर जायचे असेलतर विद्यार्थ्यांनी खडतर संघर्षातून स्वतःला सिद्ध केलेल्या आदर्शांचा अभ्यास करावा, असा कानमंत्र इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक रामदास आप्पा काकडे यांनी दिला.

येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या रामदास काकडे यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनातून साकारलेल्या भव्य क्रीडांगणावर पार पडलेल्या काव्या करीअर अकॅडमीच्या पोलीस भरती प्रशिक्षण मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी काकडे बोलत होते.

याप्रसंगी काव्या करीअर अकॅडमीचे संस्थापक व अध्यक्ष शंकर हुरसाळे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे, सतिश मिसाळ, काॅन्स्टेबल अर्चना हुरसाळे, संतोष मिचित, सुनंदा जाधव, हवालदार सुनील तळपे आदी उपस्थित होते. यावेळी काव्या करीअर अकॅडमीतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान काकडे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना काकडे पुढे म्हणाले की, इंद्रायणी महाविद्यालयात (Talegaon Dabhade) सुरू झालेल्या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात मुलींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे ही विशेष कौतुकाची बाब असून मैदानी खेळ आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मुलींनी मागे न राहता प्रयत्नपूर्वक पुढे येणे गरजेचे आहे. यशाच्या शिखरावर जायचे असेलतर विद्यार्थ्यांनी खडतर संघर्षातून स्वतःला सिद्ध केलेल्या आदर्शांचा अभ्यास करावा व त्यातून प्रेरणा घेऊन यश संपादन करावे असा कानमंत्र काकडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

Anil Deshmukh : वर्षभराने अनिल देशमुख तुरुंगाबाहेर; कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत

पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात मोठ्या प्रमाणावर नाव नोंदणी केलेली असून दि 2 जानेवारी 2023 पासून पोलीस भरती प्रशिक्षण तर दि 9 जानेवारी पासून पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रशिक्षणाला सुरूवात होणार असल्याची माहिती काव्या ॲकडमीचे संचालक शंकर हुरसाळे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अश्विनी कुडेकर यांनी केले तर अर्चना हुरसाळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.