Chinchwad: चिंचवड, भोसरी मतदारसंघासाठी आमदार निधीतून सॅनिटायझर खरेदी

Chinchwad: Purchase of sanitizer from MLA fund for Chinchwad, Bhosari constituency प्रत्येकी तीन लाख याप्रमाणे एकूण सहा लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचे जिल्हा नियोजन समितीने कळविले आहे.

एमपीसी न्यूज – चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातील आमदारांच्या निधीतून 12 हजार सॅनिटायझर खरेदी करण्यात येणार आहेत. पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटीक्स कंपनीकडून थेट पद्धतीने हे सॅनिटायझर घेण्यात येणार असून त्यासाठी सहा लाख रूपये खर्च होणार आहेत.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या आमदार निधीतून कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सॅनिटायझर खरेदी करण्यात येणार आहेत.

त्यासाठी प्रत्येकी तीन लाख याप्रमाणे एकूण सहा लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचे जिल्हा नियोजन समितीने कळविले आहे.

त्यानुसार, या कामाचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांनी या खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

ही सॅनिटायझर खरेदी तातडीने करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने 200 मिलीलीटर सॅनिटायझरसाठी 100 रूपये दर निश्चित केला आहे.

पिंपरीतील हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनीने 100 मिलीलीटरसाठी 49.72 रूपये दर दिला आहे. त्यानुसार, हिंदुस्थान अँटिबायोटीक्स कंपनीकडून 12 हजार 67 सॅनिटायझर बॉटल्या खरेदी करण्यात येणार आहेत.

त्यासाठी 5 लाख 99 हजार रूपये खर्च होणार आहे. कोणताही करारनामा न करता थेट पद्धतीने ही खरेदी केली जाणार आहे. या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.