Chinchwad : बिर्याणी विक्रेत्यास चाकूच्या धाकाने लुटले!

एमपीसी न्यूज – बिर्याणी विक्रेत्याच्या छातीला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने लुटल्याचा प्रकार रविवारी (दि. 8) रात्री साडेआठ वाजता वाल्हेकरवाडी, शिवाजी चौक, चिंचवड येथे घडला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेजस वायदंडे (रा. वेताळनगर, गोविंद सोनावणे (रा. वाल्हेकरवाडी), माउली दौंड (रा. वाल्हेकरवाडी), बंटी तोरट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी संदीप उर्फ बाबू रामभाऊ वाल्हेकर (वय 35, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीद कमरुद्दीन शाह (वय 28) हे फिर्यादी यांच्याकडे भाड्याने राहतात. त्यांचा बिर्याणी विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजता आरोपी फरीद यांच्या दुकानावर आले. त्यांनी फरीद यांच्या छातीला चाकू लावला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

आरोपींनी फरीद यांच्या दुकानाच्या गल्ल्यातील 750 रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि फरीद यांना मारहाण करून पळून गेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.