Chinchwad : अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे विविध पुरस्कारांचे रविवारी वितरण

एमपीसी न्यूज – अण्णासाहेब मगर सोशल स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे रविवारी (दि. 16 जून) विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यह येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहूल जाधव, नगरसेवक शीतल शिंदे, शैलेंद्र मोरे, भाऊसाहेब भोईर, जयश्री गावडे, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, निळकंठ चिंचवडे, अॅड. हरिभाऊ सुरवसे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष गुलाब बिरदवडे यांनी दिली.

  • या पुरस्कारामध्ये संतोष बारणे (पिंपरी-चिंचवडभूषण), विलास मडिगेरी (नगरसेवक), एस. बी. पाटील (जीवनगौरव), शर्मिला बाबर (नगरसेविका), नारायण बडगुजर, मुकुंद परंडवाल (पत्रकारिता), नीलेश वर्मा, भीमसेन अग्रवाल, अॅड. राजेंद्र मुथा, रमेश पवार, शंकर जगताप, डॉ. धनंजय वर्णेकर, राजेंद्र सिंह, अॅड. प्रफुल्ल टिळेकर, अमित फरांदे, देवेंद्र बाकलीवाल, किरण चोपडा, रामभाऊ कुदळे, बिजी गोपकुमार, बाळासाहेब शेलार, चंद्रकांत गावडे, भास्कर फडतरे, विनोद मालू, धनाजी कुंभार. एम. व्ही. परमेश्वरन. हेमंत चिंचोळकर, मनीषा पानसरे, अमित भोईटे, के. एस. रवी, हनुमंत जाधव, मनोहर मुळे. आशिष राणे, मेघना मोघे, मनीषा थोरात-पिसाळ, मच्छिंद्रनाथ कदम, नूतन आगज्ञान, विजय पुजारी आदींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.