Chinchwad : कोयत्यासह तडीपार गुंडाला अटक

एमपीसी न्यूज – कोयता घेवून फिरणाऱ्या (Chinchwad ) तडीपार गुंडाला चिचंवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.5) चिंचवड लिंकरोड येथे केली आहे.

अमन आजिम शेख (रा. पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलीसअंमलदार रोहित पिंजरकर (वय 34) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chinchwad : मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून तरुणाच्या घरावर हल्ला करत सामानाची तोडफोड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तडीपार केले होते. असे असताना देखील आरोपीने बेकायदेशीर रित्या कोयता घेवून फिरत होता. (Chinchwad )पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. यावेळी त्याच्याकडून कोयता जप्त केला. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.