Chinchwad : एसकेएफ क्रेडिट सोसायटीकडून दहा टक्के लाभांश जाहीर

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील एसकेएफ इंडिया एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात एक कोटी ब्याऐंशी लाख अडतीस हजार सहाशे अठ्ठयाहत्तर रुपयांचा (रु. १,८२,३८,६७८/-) नफा कमविला असून दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभेचे अध्यक्ष अमोल दागडिया यांनी ही घोषणा केली.

या पतसंस्थेकडे सोळा कोटी पंचावन्न लाख चौऱ्याणव हजार चारशे (रु. १६,५५,९४,४००/-) रुपयांचे भाग भांडवल असून दोन कोटी सत्या ऐंशी लाख सत्तावीस हजार तीनशे पंचेचाळीस (रु. २,८७,२७,३४५) रुपयांचा राखीव निधी आहे.

  • मार्च २०१९ अखेर एसकेएफ क्रेडिट सोसायटी सभासद संख्या ९५१ एवढी आहे. सभासदांना ८ टक्के व्याज दराने नऊ लाख रुपयांपर्यंत दीर्घ मुदतीचे कर्ज, तर १२ टक्के व्याजदराने दहा हजार रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज मिळते. पारदर्शीपणा हे सोसायटीचे बलस्थान आहे. आजपर्यंत गेली ५३ वर्षे संस्थेने सातत्याने लेखापरीक्षणात (ऑडिट) ‘अ’ वर्ग मिळविला आहे.

एसकेएफ सोसायटीच्या वतीने कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यात प्रामुख्याने ऊर्जा बचतीअंतर्गत पर्यावरणपूरक वॉटर सोलर सिस्टीम, एलईडी बल्ब आणि ट्यूब लाईट यांचे वितरण, पासपोर्ट हेल्पडेस्क, लॅपटॉप आणि बुलेट मोटारसायकल खरेदी योजना आदींचा अंतर्भाव असून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या सभासदांच्या पाल्यास रु. २५०१/- देऊन गौरविण्यात येते.

  • संस्थेच्या प्रत्येक वर्धापनदिनी वेगवेगळ्या बिगर सरकारी, विनाअनुदानित दोन सामाजिक संस्थांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. एखाद्या सभासदाचे निधन झाल्यास त्याचे कायदेही वारसास रुपये दोन लाख इतकी मदत दिली जाते. त्यासाठी प्रतिवर्षी रु. ७२०/- (सातशे वीस रुपये) मृत्यूफंड म्हणून जमा केला जातो. त्याचा उपयोग मयत सभासदाच्या कर्जाचा बोजा कमी होण्यासदेखील होतो.

एसकेएफ क्रेडिट सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांत गोविंद शेवते (अध्यक्ष), अमोल दागडिया (उपाध्यक्ष), श्रीपाद नाथी (सचिव), देवेंद्र घोडके (सहसचिव), राजेंद्र बोरगे (खजिनदार), नवनाथ तापकीर (तज्ज्ञ संचालक), तर व्यवस्थापन समितीत ज्ञानोबा देवकर, सुनील आव्हाळे, मिलिंद श्रीखंडे, दीपक लोहार, प्रबोध साळवी, भागवत मोरे, सुरेश शिंदे, जितेंद्र गायकवाड यांचा समावेश आहे. दीपाली सुतार पतसंस्थेचे कामकाज सुरळीत ठेवतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.