Chinchwad : जेवढं चांगले काम करू, तेवढे परिणाम चांगले मिळतात – सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात अधिकारी, 14 कर्मचारी निवृत्त

एमपीसी न्यूज – पोलीस दलात काम करत असताना सतत अलर्ट राहून काम करणं महत्वाचं आहे. आपण स्वतःला जेवढं झोकून देऊन काम करू तेवढे त्या कामाचे चांगले परिणाम पाहायला मिळतात, असे मत सहाय्य्क पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील सात अधिकारी आणि 14 कर्मचारी निवृत्त झाले. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात या सर्वांना निरोप देण्यात आला.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त सतीश पाटील, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, नीलिमा जाधव, चंद्रकांत अलसटवार, श्रीकांत मोहिते, सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधीकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी निवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.

  • पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील प्रशासकीय अधिकारी रमेश देवळेकर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर, आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तू शिंदे, देहूरोड-तळेगाव वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश हगवणे, निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब खामगळ, हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी होळकर हे सात अधिकारी तर सहाय्यक फौजदार नामदेव भोर, तुकाराम टोणपे, परशुराम खानदेश, मछिंद्र जगताप, गजानन गोरड, बबन इरले, सुनील कदम, दिनकर गरुड, पंडित बुर्डे, अशोक बगाटे, अरुण भोसले, दिगंबर नातू, आनंद कुरुंदकर, पोलीस हवालदार अरुण लांडे हे 14 कर्मचारी निवृत्त झाले. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या संकल्पनेतून निवृत्त होणा-या प्रत्येक अधीकारी आणि कर्मचा-यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील म्हणाले, 1983 साली पोलीस दलात रुजू झालो. पोलीस दलात सेवा करत असताना मुंबई, कल्याण, पुणे, पुणे ग्रामीण, सातारा, अँटी करप्शन, सीआयडी क्राईम, पिंपरी-चिंचवड शहर यांसारख्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. पिंपरी विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम करत असताना पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची सुरुवात झाली. त्यामध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत 36 वर्ष पोलीस दलात सेवा केली आहे. वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी अतिशय चांगले लाभले. त्यामुळे निवृत्तीच्या दिवशी देखील मी समाधानी आहे.”

  • सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगूळकर म्हणाले, “पोलीस दलात सेवा करत असताना अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. पोलीस दलातील सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले. सर्व सहकारी आणि अधिका-यांचे अतिशय चांगले सहकार्य मिळाले. पोलीस आयुक्तांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे शहरात काम करण्यास उत्साह आला.”

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, “पोलीस दलात काम करताना मोठी जबाबदारी येते. घरच्यांसह समाजाच्या हितासाठी सतत पोलिसांना कार्यरत राहावे लागते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर आयुक्तालयाला अनेक अडचणी होत्या.

  • एक कर्मचारी चार कर्मचा-यांचे काम करत होता. तर, एक अधिकारी काही अधिका-यांचे काम करत होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीमध्ये प्रत्येक कर्मचारी आणि अधिका-याचे योगदान मोलाचे आहे. नोकरी करत असताना ब-याच वेळेला कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. सेवानिवृत्तीनंतर कुटुंबासाठी अधिक वेळ द्यावा. निवृत्तीनंतरचा कालावधी हा आनंदाचा कालावधी असतो. त्या आनंदाचा उपभोग घ्या.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी केले. आभार सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.