Class XI Admission: पुणे, पिंपरी चिंचवड मधील अकरावी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

Class XI Admission: Eleventh admission process in Pune, Pimpri Chinchwad from tomorrow राखीव जागांच्या (कोटा) प्रवेशासाठी 'झिरो राऊंड' 12 ते 22 ऑगस्ट दरम्यान घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना 11thadmission.org.in या संकेतस्थळावरून अकरावी प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला उद्यापासून (दि.12) सुरूवात होत आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाने अकरावी प्रवेश प्रक्रियाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, 30 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक ऑगस्ट रोजी पुणे पिंपरी-चिंचवडसह मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देत अकरावी प्रवेशासाठी संकेतस्थळाचे उद्घाटन केले होते.

_MPC_DIR_MPU_II

यावर्षी 304 कनिष्ठ महाविद्यालयात 1 लाख 6 हजार 812 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वाधिक 46 हजार 981 जागा या विज्ञान शाखेसाठी आहेत. आतापर्यंत 90 हजार 648 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर 23 हजार 440 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

राखीव जागांच्या (कोटा) प्रवेशासाठी ‘झिरो राऊंड’ 12 ते 22 ऑगस्ट दरम्यान घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना 11thadmission.org.in या संकेतस्थळावरून अकरावी प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like