Pimpri News : रामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक सोहळ्याची सांगता

एमीसी न्यूज – श्रीरामनवमी आणि हनुमान जयंतीचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मंदिर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली प्राधिकरण येथे वीर हनुमान मंदिर प्रांगणात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याची सांगता उत्साहात झाली.

रविवार (दि. 10) ते शनिवार (दि. 16) या कालावधीत विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम पार पडले. शनिवारी पहाटे हनुमान जयंतीनिमित्त प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य देवराम मेदनकर यांच्या हस्ते हनुमान मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्याचबरोबर पहाटे पाच ते सात यावेळी ह.भ.प. सुदाम महाराज हिंगे यांचे हनुमान जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी चार वाजता दिगंबर राणे आणि सहकारी यांचा सोहम अभंगवाणी हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी अत्यंत सुंदर फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर पाहण्यासाठी अन् दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.

सोहळ्याचा समारोप सायंकाळी साडेसहा वाजता महाआरती आणि सात ते रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाने करण्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका मंगला कदम, नगरसेविका योगिता नागरगोजे, संजय नेवाळे, सुनील लोखंडे, विष्णू नेवाळे, मुख्य अन्नदाते देवराम मेदनकर आणि प्रमोद सोनवणे याशिवाय परिसरातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण आठवडाभर परिसरातील नागरिकांनी आरोग्य शिबिरासह सर्व कार्यक्रमांचा लाभ घेतला. स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे संतोष ठाकूर, शंकर मालगट्टी, दत्तात्रय पोतदार, वैजनाथ गुळवे, मोहन सावरे,पप्पूशेठ भोसले, जयसिंग भोसले, राजेंद्र साठे, हंबीरराव भिसे, अशोक हाडके, सुनील खंडाळकर, दिलीप मांडवकर, बापूराव साळुंखे, महेंद्र माकोडे, संजय सुतार, पंडित मदने, रामकृष्ण पाटील, विक्रम ठाकूर श्रेणिक पंडित यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.