Maval : भाजप मावळ तालुक्याच्या वतीने गिरीश बापट यांचे अभिनंदन 

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची पुणे लोकसभा मतदारसंघात खासदारपदी भरघोस मतांनी निवड झाल्याबद्दल त्यांचे मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.

पुणे जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार संजय बाळा भेगडे यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार गिरीश बापट यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा मावळ तालुकाध्यक्ष प्रशांत आण्णा ढोरे, माजी सभापती एकनाथराव टिळे, निवृत्तीभाऊ शेटे, सभापती गुलाबराव म्हाळस्कर, गणेश तात्या भेगडे, बाबूलाल मामा गराडे, इंदरशेठ ओसवाल, संदीपशेठ काकडे, गिरिशशेठ गदिया, राहुलजी गोळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.