Congress : काँग्रेसने संपूर्ण भारतीयांना एका छताखाली आणण्याचे काम केले – द. स. पोळेकर

एमपीसी न्यूज – देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्थापन (Congress) झालेल्या काँग्रेस पक्षाने जात, धर्म, पंथ, भाषा याला सोडून संपूर्ण भारतीयांना एका छताखाली आणण्याचे काम केले. काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देवून देशाचे रक्षण केले आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच शेवटच्या माणसाच्या दृष्टीने विचार केला. स्वातंत्र्यसारखा उदात्त हेतू घेवून स्थापन झालेल्या काँग्रेस पक्ष हा भारतीयांची ओळख असणारा पक्ष आहे. ब्रिटीश साम्राज्याच्या विरुद्ध लढा देण्यासाठी देशातील लाखो लोकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली अनेक आंदोलने केली. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद अनेक थोर नेत्यांनी भुषविले, महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, दादाभाई नौरोजी, सरफिरोजशहा मेहता, ॲनी बेझंट, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू व इंदिरा गांधी सारख्या दिग्गज नेत्यांनी नेतृत्व केले. महात्मा गांधींनी समाजातील सर्व घटकांना एकत्र करून अंहिसा मार्गे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देऊन देश स्वतंत्र्य केला, असे जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर म्हणाले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सकाळी 10 वा. काँग्रेस भवन येथे द. स. पोळेकर यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Pune : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम – चंद्रकांत पाटील

झेंडावंदनाची पूर्वतयारी काँग्रेस सेवादलाच्या वतीने करण्यात आली. यावेळी झेंडा गीताने झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाची सांगता झाली.

झेंडावंदन प्रसंगी नगरसेवक अविनाश बागवे, स्थायी समितीच्या (Congress) माजी अध्यक्षा नीता रजपूत, ॲड. अनिल कांकरिया, ॲड. राहुल ढाले, वाल्मिक जगताप, सेवादलाचे अध्यक्ष प्रकाश पवार, श्रीकृष्ण बराटे, मुन्नाभाई शेख, क्लेमेंट लाजरस, रजिया बल्लारी, शारदा वीर, रवि ननावरे, मारूती माने, ॲड. बाळासाहेब बाणखेले, अर्जुन लोणंदकर, रंजना रजपूत, विणा कदम, सीमा महाडिक, पांडुरंग सोंडकर, नाना भेगडे, शालिनी शिंदे, अंजली पुंगालिया, विद्या माथे, महादेव गिलबिले, भाग्यश्री गायकवाड, मंदाकिनी वारे, मनोहर गाडेकर, राज अंबिके, शशिकांत बिबवे, देवीदास लोणकर आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.