Kartiki Yatra :आळंदीमध्ये पालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वारकरी भाविकांसाठी सोयी सुविधा

एमपीसी न्यूज: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा व कार्तिकियात्रेनिमित्त पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज होऊन त्यांच्या मार्फत वारकरी भाविक नागरीकांकरीता आळंदी मध्ये सर्वत्र विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

पालिका प्रशासन तर्फे वारकरी भाविकांसाठी इंद्रायणी नगर,जुना बंधारा, माऊली बागेच्या पाठीमागे ,केळगाव आळंदी रस्त्यावर,वारकरी शिक्षण संस्थेजवळ(चाकण रस्त्या),चऱ्होली रस्ता अश्या इतर विविध ठिकाणी मोबाईल शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर चाकण चौक ,वडगांव रस्ता,मरकळ रस्ता अश्या विविध ठिकाणी वारकरी भाविकांसाठी पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आली आहे.

Pune News : भारतीय विद्या भवनमध्ये 19 नोव्हेंबर रोजी ‘पाऊसवेळा’ कार्यक्रम

पालिका प्रशासनातर्फे वारकरी भाविकांसाठी विविध सूचना फलक शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत.पालिका प्रशासन ,स्पेशल प्रसाशन पथक व पोलीस प्रसाशन वेळोवेळी फुटपाथवरील, रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात कारवाई करताना दिसत आहे.पोलीस प्रशासना मार्फत त्याबाबत व वारकरी भाविकांसाठी नागरिकांसाठी वेळोवेळी सूचना स्पीकर द्वारे शहरात देत आहेत.प्रशासकीय नियोजन बैठकीमध्ये अतिक्रमणाबाबत ठरल्याप्रमाणे योग्य पद्धतीने तसेच तोंड बघून कारवाई न करता योग्य अशी कारवाई झाल्याने नागरिक भाविक वारकरी यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.

योग्य त्या ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यात आला आहे.अग्निशमन दल शहरात सुसज्ज आहे.नदीपात्रा मध्ये मदतकार्या करीता बोट व्यवस्था ठेवण्यात आली आहे.आळंदी शहरात ठिक ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारली आहेत. पोलीस तिथे नागरिकांची विविध प्रकारे मदत करताना दिसत आहेत.पोलिसां मार्फत वारकरी भाविकांसाठी शहरात सर्वत्र सूचना फलक लावण्यात आले आहे. शहरात व आजूबाजूच्या परिसरात ,मंदिर व मंदिर परिसरात पोलीस आणि वाहतूक पोलिस आप आपले कार्य व्यवस्थितपणे पार पडताना दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.