Corona Vaccine : लहान मुलांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस ; आदर पूनावाला यांची माहिती

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. सध्या 18 वर्षांच्या पुढील प्रत्येकाला लस मिळत असून, लहान मुलांसाठी अद्याप लसीकरण सुरू झालेले नाही. पण, लवकरच तीन महिन्याच्या पुढील मुलांनाही कोरोना लस मिळणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आयोजीत करण्यात आलेल्या सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये बोलताना अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे. पुढील सहा महिन्यात तीन वर्षाच्या वरील मुलांसाठी कोरोना लस विकसीत केली जाईल. असे पूनावाला यांनी सांगितले. शिवाय उपलब्ध डेटाच्या आधारे हे सांगणे सुरक्षित राहिल की, बूस्टर लसीचे डोस अँटीबॉडीज मिळविण्यासाठी चांगले धोरण आहे, असेही पूनावाला यावेळी म्हणाले.

दरम्यान, देशात युद्धपातळीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. देशात आतापर्यंत 134 कोटी 54 लाख 718 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. त्यापैकी 52 कोटी 49 लाख 53 हजार 866 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तर, 82 कोटी 07 लाख 65 हजार 368 जणांनी लसीचा केवळ एकच डोस घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.