Corona World Update: सलग चौथ्या दिवशी रुग्णवाढीच्या वेगात घट तर सलग सहाव्या दिवशी मृत्यूदरातही घट

Corona World Update: For the fourth day in a row, the growth rate of new patients has dropped, and for the sixth day in a row, the death toll has also dropped.

एमपीसी न्यूज – जगभरातील एक दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग चौथ्या तर कोरोना मृतांच्या आकड्यात सलग सहाव्या दिवशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण आता सहा टक्क्यापेक्षा कमी झाले आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी 45.61 टक्क्यांपर्यंत वाढल्याने आता जगातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 48.46 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, या बाबी दिलासा देणाऱ्या आहेत. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 63 लाख 66 हजार 193 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 77 हजार 437 (5.93 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 29 लाख 03 हजार 605 (45.61 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 30 लाख 85 हजार 151 (48.46 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 30 लाख 31 हजार 748 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 403 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

26 मे – नवे रुग्ण 92 हजार 060, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 048

27 मे – नवे रुग्ण 1 लाख 06 हजार 475, दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 283

28 मे – नवे रुग्ण 1 लाख 16 हजार 304, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 612

29 मे – नवे रुग्ण 1 लाख 25 हजार 511, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 872

30 मे – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 102, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 084

31 मे – नवे रुग्ण 1 लाख 08 हजार 767, दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 191

1 जून – नवे रुग्ण 1 लाख 03 हजार 050, दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 017

अमेरिकेत 6 लाखांपेक्षा अधिक कोरोना मुक्त

अमेरिकेत सोमवारी 730 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 06 हजार 925पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 18 लाख 59 हजार 323 झाली आहे तर 6 लाख 15 हजार 416 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

ब्राझीलने ओलांडला कोरोना बळींचा 30 हजारांचा टप्पा

ब्राझीलमध्ये सोमवारी 732 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 30 हजार 046 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 5 लाख 29 हजार 405 झाली आहे तर 2 लाख 11 हजार 080 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

चिलीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे

एक लाखपेक्षा अधिक कोरोना संसर्ग झालेला चिली हा जगातील 13 वा देश ठरला आहे. आतापर्यंत चिलीमध्ये 1 लाख 05 हजार 159 जणांना कोरोना संसर्ग झाल्याची नोंद आहे. त्यापैकी 1 हजार 113 जणांचा मृत्यू झाला आहे तर 44 हजार 946 कोरोनामुक्त झाले आहेत.

भारतात काल (सोमवारी) 200, रशियात 162 तर मेक्सिकोत 151 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. पेरूमध्ये 128, इंग्लंड 111, इराण 81, इटली व पाकिस्तान प्रत्येकी 60 तर चिलीमध्ये 59 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

 1. अमेरिका – कोरोनाबाधित 1,859,323 (+22,153), मृत 106,925 (+730)
 2. ब्राझील – कोरोनाबाधित 529,405 (+14,556), मृत 30,046 (+732)
 3. रशिया – कोरोनाबाधित 414,878 (+9,035), मृत 4,855 (+162)
 4. स्पेन – कोरोनाबाधित 286,718 (+209), मृत 27,127 (NA)
 5. यू. के. – कोरोनाबाधित 276,332 (+1,570), मृत 39,045 (+111)
 6. इटली – कोरोनाबाधित 233,197 (+200), मृत 33,475 (+60)
 7. भारत – कोरोनाबाधित 198,370 (+7,761) , मृत 5,608 (+200)
 8. फ्रान्स – कोरोनाबाधित 189,220 (+338), मृत 28,833 (+31)
 9. जर्मनी – कोरोनाबाधित 183,765 (+271), मृत 8,618 (+13)
 10. पेरू –  कोरोनाबाधित 170,039 (+5,563) , मृत 4,634 (+128)
 11. टर्की – कोरोनाबाधित 164,769 (+827), मृत 4,563 (+23)
 12. इराण – कोरोनाबाधित 154,445 (+2,979), मृत 7,878 (+81)
 13. चिली – कोरोनाबाधित 105,159 (+5,471), मृत 1,113 (+59)
 14. कॅनडा –  कोरोनाबाधित 91,705 (+758), मृत 7,326 (+31)
 15. मेक्सिको – कोरोनाबाधित 90,664 (+3,152), मृत 9,930 (+151)
 16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 87,142 (+1,881) मृत 525 (+22)
 17. चीन – कोरोनाबाधित 83,017 (+16), मृत 4,634 (+NA)
 18. पाकिस्तान – कोरोनाबाधित 72,460 (+2,964), मृत 1,543 (+60)
 19. बेल्जियम – कोरोनाबाधित 58,517 (+136), मृत 9,486 (+19)
 20. कतार – कोरोनाबाधित 58,433 (+1,523), मृत 40 (+2)
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like