Pune: पूर्ववैमनस्यातून कोंढवा परिसरात एकाचा खून, 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

Murder of one person in Kondhwa area due to prejudice, case filed against 4 persons

एमपीसी न्यूज- पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने एकाचा खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.1) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोंढवा येथील शाहीद कॉर्नर, नवाजीश पार्क येथे घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबलू इब्राहिम सय्यद (वय 46, रा. नवाजीश पार्कजवळ, कोंढवा, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सैफ फरिद सय्यद (वय 24), तौसिफ फरिद सय्यद (वय 25) आणि त्यांचे दोन साथीदार (नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लियाकत मंजरअली मीर (वय 62, कुंभारवाडा, कसबा पेठ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत बबलू सय्यद यांचे सैफ सय्यद आणि तौसिफ सय्यद यांच्यात पूर्वीपासून भांडण होते. तो राग सय्यद बंधूंमध्ये होता. सोमवारी बबलू हे शाहीद कॉर्नर येथे जात असताना सैफ सय्यद आणि तौसिफ सय्यद आणि त्यांच्या दोन साथीदारांनी बबलू यांना जीवे मारण्याच्या हेतूने पालगन हत्याराने डोक्यात व अंगावर वार केले. या हल्ल्यात बबलू यांचा मृत्यू झाला.

खूनाची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like