Covaxin for 2-18 yrs Old : 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ‘कोवॅक्सिन’ लसीची शिफारस

एमपीसी न्यूज – देशातील 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत बायोटेकने तयार केलेली कोवॅक्सिन (Covaxin) लस लहान मुलांना देण्यात यावी अशी शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे केली आहे. याबाबत अद्याप डीसीजीआयकडून मान्यता मिळालेली नाही. मात्र, सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीच्या शिफारसीनंतर लहान मुलांच्या लसीकरणाला लवकरच सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्र सरकार लवकरच 2 ते 18 वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करेल. मुलांवर लसीकरणासाठी मान्यता मिळण्यापूर्वी कोवॅक्सिनला दीर्घकाळ चाचणी करावी लागली. भारत बायोटेकने 18 वर्षाखालील मुलांवर तीन टप्प्यात चाचणी पूर्ण केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरमध्ये पूर्ण झाल्या यानंतरच भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मान्यता देण्यात आली आहे.

पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी अमेरिकेची कंपनी नोवावॅक्सच्या लसीवर संशोधन करत आहे. कंपनीनं भारतात या लसीचं नाव कोवावॅक्स ठेवलं आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) सीरम इंस्टीट्यूटला 7 ते 11 वयोगटातील मुलांवरील लसीच्या ट्रायलसाठी परवानगी दिली आहे. कंपनीने ही ट्रायल देशभरातील 100 मुलांवर केली आहे. मात्र या लसीच्या आपत्कालीन वापराला देशात अद्याप तरी मंजुरी मिळालेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.