Sangavi News : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या कार चालकावर गुन्हा

 

एमपीसी न्यूज – महाविद्यालयातून घरी जात असलेल्या तरुणीकडे पाहून कारमधून आलेल्या एका व्यक्तीने अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केला. (Sangavi News) ही घटना मंगळवारी (दि. 31) दुपारी दीड वाजताच्या सुमारास जगताप डेअरी वरील उड्डाण पुलावर घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार एमएच 14/ईसी 3732 क्रमांकाच्या कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : चिंचवड येथे 83 हजारांची घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी महाविद्यालयातून घरी जात असताना ती जगताप डेअरी येथील उड्डाण पुलावरून जात असताना एका कारमधून आलेल्या (Sangavi News) चालकाने तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.