Darren Sammy On Racial Abuse: सॅमीचा धक्कादायक खुलासा, IPL मध्ये करावा लागला वर्णद्वेषाचा सामना

Darren Sammy On Racial Abuse: Sammy's shocking revelation, he had to face racism in IPL

एमपीसी न्यूज- वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व IPL मध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळणारा डॅरेन सॅमी या खेळाडूने धक्कादायक खुलासा केला आहे. IPL मध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळताना वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचे म्हटले आहे.

इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये डॅरेन सॅमीने म्हटले आहे की, मी आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबादकडून खेळत असताना मला ‘काळू’ या नावाने हाक मारायचे.

मला आता त्या शब्दाचा अर्थ कळतो आहे. मी आणि थिसारा परेराला संघात काळू नावाने बोलावलं जायचं. मला वाटलं हा कुठलातरी चांगला शब्द असेल असे सॅमीने पोस्टमध्ये लिहिले आहे.

याआधीही सॅमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर फ्लॉयड यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत, क्रिकेटमध्ये आपल्यासारख्या खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना कसा करावा लागतो याबद्दल माहिती दिली होती.

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ख्रिस गेल, डॅरेन सॅमी यांनीही या प्रकरणावर आपलं परखड मत मांडलं.

ख्रिस गेलने फुटबॉलमध्ये नाही तर क्रिकेटमध्येही खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो असं विधान केलं होतं.

अमेरिकेमध्ये सध्या कृष्णवर्णीय नागरिकाची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्यासंबंधीच ‘ICC ’ने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील शेवटच्या चेंडूची चित्रफीत टाकताना त्यामध्ये इंग्लंडच्या ‘जोफ्रा आर्चर’वर अधिक लक्ष केद्रित केले आहे.

विविधतेशिवाय क्रिकेट अशक्य आहे, अशा आशयाचा मजकूर टाकला आहे. दरम्यान, ICC च्या या मोहिमेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यापासून ख्रिस गेल आणि डॅरेन सॅमीने सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.