Dasara Melava : उद्धव ठाकरे यांचे भाषण शिमग्याचे भाषण; देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

एमपीसी न्यूज : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Dasara Melava) त्यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा भव्य मेळावा पार पडला. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केलं. त्यांच्या या भाषणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर उद्धव ठाकरे यांचं भाषण शिमग्याचे भाषण होतं. आणि शिमग्याच्या भाषणावर प्रतिक्रिया देत असतात, असं म्हणत त्यांच्या या भाषणाची उडवली. देवेंद्र फडणवीस आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले,  मुंबईत दसरा मेळावा शिवसेनेचा व शिंदे गटाचा पार पडला. मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना कोणाची हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरेंचे भाषणात भाषणात शिमगा सोडून काहीच नव्हते आणि बीकेसीमध्ये प्रचंड गर्दी होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात भाजपची Script वाचत (Dasara Melava) होते, अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, Script भाजपची म्हणणाऱ्यांनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.