Dasara Melava : दसरा मेळाव्यात काहींची भाषण फारच लांबली – अजित पवार

एमपीसी न्यूज : दसरा मेळाव्यात (Dasara Melava) काहींची भाषणे फारच लांबली,असे म्हणत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला. अजित पवार आज सकाळी बारामती बोलत होते. दसरा मेळाव्यातील कुणाचं भाषण तुम्हाला सर्वाधिक आवडलं असा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवारांनी हे उत्तर दिलं. 
अजित पवार म्हणाले, ही काही आवडी निवडी करता भाषणं नव्हती. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायला मुंबईत यायचे, ही परंपरा आहे. पण दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी रुपये खर्च करून मेळाव्याला गर्दी जमा केली. यासाठी एसटी बससेचा उपयोग केला गेला. मात्र, अनेक एसटी बस दसरा मेळाव्यासाठी गेल्याने सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली. यामुळे अशा गोष्टी करता कामा नये.

जनतेसाठी गाव तिथे एसटी हे धोरण (Dasara Melava) राबवलं गेलं. त्यांच्यासाठी एसटी आहे. आणि कशा प्रकारे वापर झाला हे दिसलंच, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटाला टोला लगावला. दसरा मेळाव्यात काहींची भाषणं फारचं लाबंली. नको इतकी लांबली. आता कुणाची लांबली ते तुम्हीच विचार करा, असं म्हणत अजित पवारांना कोपरखळी मारली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.