Ravan Dahan : यमुनानगरमध्ये 40 फुटी रावण दहन ; नागरिकांची अलोट गर्दी

एमपीसी न्यूज – निगडी, यमुनानगर येथे विजयादशमीनिमित्त 40 फुटी रावण दहन (Ravan Dahan) करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. माजी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंदराव देशपांडे, प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंतराव हरहरे, क्रीडा भारतीचे कोषाध्यक्ष  मिलिंदराव डांगे, ॲड. सतिशराव गोरडे यांच्या हस्ते रावणदहन करण्यात आला. निगडीमधील नंदकुमार कुलकर्णी, राजेंद्र त्र्यंबके, सचिन ढोबळे, पराग सहस्त्रबुद्धे, दीपक कुलकर्णी, शंतनू गटणे, अक्षय खोत उपस्थित होते.

Dasara Melava : उद्धव ठाकरे यांचे भाषण शिमग्याचे भाषण; देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

त्याचबरोबर नागरिकांसाठी मनोरंजनसाठी नृत्यार्पण स्कूल ऑफ भरतनाट्यम विजयोत्सव संचालिका सायली देवधर आणि विद्यार्थीनी यांची भरतनाट्यम नृत्य प्रस्तुती व एव्ही डान्स स्टुडिओ यमुनानगर क्लासिकल डान्स सादर केला.
या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सुतार, प्रभू बालचंद्रन, उमेश घोडेकर, भिमाजी पानमंद, संकेत चित्ते, प्रशांत तरटे, स्वप्नील लोंढे, प्रशांत केंदळे, संकेत जुनघरे, ऋषिकेश महामुनी, कौस्तुभ देशपांडे, विशाल केंदळे, पंकज साबळे, किरण घोटाळे, सचिन ठाकूर, उत्तम केंदळे स्पोर्ट्स क्लब आदींनी (Ravan Dahan) परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.