Pimpri News : कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अवकाश संशोधनाच्या दृष्टीने डेटा सायन्स महत्त्वाचे – स्क्रीस जॅक्सन

एमपीसी न्यूज – भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अवकाश संशोधनाच्या दृष्टीने डेटा सायन्स महत्त्वाचे असल्याचे मत साऊथ एशिया आणि कोरीया टेराडेटा कॉर्पोरेशनचे क्लाउड लिडर स्क्रीस जॅक्सन यांनी व्यक्त केले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने 17 ते 21 जानेवारी 2022 या कालावधीत ‘पीसीएमसी ओपन डेटा सप्ताह 2022’ चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात डाटा पर्स्पेस्टीव्हस ऑन स्मार्ट सिटीज या विषयावर ते बोलत होते.

जॅक्सन म्हणाले, डेटा सायंटिस्टची गरज सर्वच क्षेत्रात आहे आणि असणार आहे. असेही नाही की डेटा सायन्स नवीनच क्षेत्र आहे. औषधनिर्मिती उद्योगात औषधाची परिणामकारकता व बँका त्यांची उधरीची जोखीम (क्रेडिट रिस्क) ठरवण्यासाठी गेली 40 ते 50 वर्षे डेटा सायन्सचा वापर करत आहेत. वर्तमान काळात, ई- व्यवहारची चलती आहे. यामध्ये सर्वच क्षेत्रात डेटा सायन्स वापरले जाते. तसेच भविष्यात, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, अवकाश संशोधनाच्या दृष्टीने डेटा सायन्स अतिशय महत्वाचे आहे. भारतात 2019 मध्ये 97000 डेटा सायंटिस्टच्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत. येत्या काळात डेटा सायंटिस्टची मोठी गरज भासणार आहे.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे नॅशनल मिशन मॅनेजर अंशुमन कुमार (युज डाटा फॉर सोल्व्हींग सिव्हील प्रॉब्लेम), पुणे विद्यापीठाच्या डॉ. आकांक्षा काशीकर (प्रेडिक्टीशन ऍ़नालॅसीस अँड एमएल), युडाईचे डेप्युटी जनरल डायरेक्ट सुम्नेश जोशी (बॅलंन्सींग प्रायव्हसी अँड सेक्युरिटी इन ओपन डाटा), मॅनेजिंग डायरेक्टर (Easy Gov) अमीत शुक्ला (डिजीटल मोनोपॉली) या विषयांवर मार्गदर्शन केले. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन सेंटरच्या डायरेक्टर डॉ. अपुर्वा पालकर यांच्यासह डेटा क्षेत्रात काम करणा-या तज्ज्ञ मंडळींसह 1200 विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.