Katraj : पाण्याच्या टाकीत आढळला महिलेचा मृतदेह

एमपीसी न्यूज – महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पाण्याच्या टाकीमध्ये फेकलेला मृतदेह आढळून आल्याने आंबेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज दुपारी 12 च्या सुमारास आंबेगाव येथील एका सोसायटीमध्ये घडली. 

सपना तमांग (वय 42) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथील एका सोसायटीच्या पाण्याच्या टाकीमध्ये एका महिलेचा मृतदेह तेथील नागरिकांना मिळाला आहे. या गंभीर घटनेची माहिती नागरिकांनी तेथील पोलिसांना कळवली असता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्या महिलेचा मृतदेह पाण्याच्या टाकीतून बाहेर काढून ससून रुग्णालयात तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच या मृत महिलेच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी चालू आहे. खूनाचे कारण अद्याप उघडकीस आलेले नसून याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.